अल कायदाच्या 3 जणांना एनआयएची कोठडी

एर्नाकुलम (केरळ) – एर्नाकुलमच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आज अल कायदाच्या तिघा हस्तकांना राष्ट्रीय तपास संस्थेची कोठडी सुनावली. मुर्शिद हसन, मुसराफ होसीन आणि याकूब बिस्वास अशी या तिघांची नावे असून या तिघांना शनिवारी ‘एनआयए’ने अटक केली होती. या तिघांना 22 सप्टेंबरपर्यंत ‘एनआयए’ची कोठडी सुनावण्यात आली आहे. 

अल कायदाशी संबंधित सुमारे 10 जण देशभरात घातपाती कृत्ये घडवण्यासाठी कार्यरत आहेत. हे सर्व बंगाली भाषिक असून अल कायदा या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी ते संबंधित आहेत. यांचा म्होरक्‍या बंगाली असून त्याने दक्षिण आणि पूर्व भारतात अनेक ठिकाणी प्रवास केला आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

हे सर्वजण घातपाती कारवाया करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी संकलन करत आहेत. त्यांनी घातक शस्त्रे आणि दारुगोळाही जमा करायला सुरुवात केली आहे.

सर्वजण कट्टरवादी विचारसरणीने भारलेले असून आपल्या जिहादी कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी व्यापक प्रमाणावर कट्टरवादाचे जाळे उभारण्याचाही प्रयत्न सुरू केला आहे, असे त्यांच्याजवळील कागदपत्रांवरून स्पष्ट होते आहे, असे ‘एनआयए’ने आपल्या अर्जामध्ये म्हटले आहे.

या सदस्यांच्या व्हॉट्‌स ऍप चॅट, फोटो आणि व्हिडीओमधून त्यांची जिहादी मानसिकता स्पष्ट होते, असेही ‘एनआयए’ने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.