पुणे – पुणे मेट्रोसाठी सुमारे 98 टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये सुमारे 32 किलोमीटर मेट्रोचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामेट्रोने ठेवले आहे. पिंपरी ते फुगेवाडी, वनाझ ते गरवारे कॉलेज या दोन मेट्रो मार्गांनंतर गरवारे कॉलेज ते शिवाजीनगर न्यायालय हा मेट्रो मार्ग एप्रिलमध्ये सुरू करण्याचे उद्दिष्ट महामेट्रोने ठेवले आहे.
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या मार्गावर मेट्रो धावणार आहे. भूसंपादन झालेल्या क्षेत्रात शासकीय जागा 41.94 हेक्टर्स तर खासगी जागा सुमारे 1 हेक्टर इतकी आहे. मेट्रो प्रकल्पाच्या मार्गातील सर्वांत महत्वाचा हा टप्पा पार झाला आहे. त्यामुळे यापुढील काम आणखी गतीने मार्गी लावण्याचे नियोजन महामेट्रोकडून सुरू करण्यात आले आहे.