कात्रज,- कात्रज येथील प्रभाग क्र. ३८मध्ये उत्कर्ष सोसायटीतील रस्त्याच्या भूमिपूजनावरून स्थानिक नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली. या दोघांमध्ये थेट रस्त्यावरच वादविवादी झाली. उत्कर्ष सोसायटी येथे वादाचा “व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रकाश कदम भाजप नगरसेविका मनिषा कदम यांनी डांबरीकरण कामासाठी निधी आपणच मंजूर केला असल्याचे सांगताना दोघांमधील शाब्दिक वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वरून समोर आला.
कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलाव प्रवेशद्वार ते शेलारमळा, गुजरवस्ती, महादेवनगरकडे जाणारा मुख्य रस्ता असल्याने मोठी वाहतूक असते. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीची मागणी जोर धरत होती. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने नागरिकांना आकर्षित करण्यासाठी नगरसेवकांमध्ये विकासकामे, भूमिपूजन विविध प्रकारचे उपक्रम करण्याच्या स्पर्धा सुरु आहेत. त्यावरून अनेक ठिकाणी प्रभागामध्ये श्रेयवाद लढाई पाहायला मिळते. यातीलच हा प्रकार असल्याचे दिसून येते.
” दोन्ही नगरसेवकांनी या रस्त्याला वेगवेगळ्या माध्यमातून निधी मिळवला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून निधी असल्याने भूमिपूजनावरून विसंवाद झाल्याने गोंधळ झाला. तरी आता दोन्ही नगरसेवकांनी कामाची विभागणी करून काम करण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे या वादावर पडदा पडला आहे. -संदीप कदम, उपायुक्त, परिमंडळ-४