#CWC19 : वीस हजारी मनसबदार होण्याची कोहलीस संधी

साउदॅम्पटन – गतविजेता ऑस्ट्रेलिया व त्यापाठोपाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचाही दणदणीत पराभव करणाऱ्या भारताच्या दृष्टीने आज सोपा पेपर आहे. अफगाणिस्तानवर विजय मिळवित उपांत्य फेरीसाठी एक पाऊल पुढे टाकण्याची संधी भारताला मिळणार आहे. तसेच विराट कोहलीस वीस हजारी मनसबदार होण्याची संधी असणार आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहली याच्याकडून अनेक वेळा विक्रम मोडले जात असतात. आज त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या कारकीर्दीत वीस हजार धावांचा टप्पा पार करण्याची संधी आहे. त्याने आतापर्यंत 19 हजार 896 धावा केल्या आहेत. त्याने आज 104 धावा केल्या तर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 20 हजार धावा करणारा तो भारताचा तिसरा फलंदाज होईल. यापूर्वी सचिन तेंडूलकर (34,357) व राहुल द्रविड (24208) यांनी ही कामगिरी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)