डेव्हिस चषकात भारतीय संघ 2-0 ने मागे

कोलकाता  -डेव्हिस कप टेनिस स्पर्धेतील इटली विरुद्धचे सामने ग्रास कोर्टवर खेळण्याचा भारतीय संघाचा निर्णय पुरता फोल ठरला असून राजकुमार रामनाथन आणि प्रजनेश गुन्नस्वरन यांनी आपले एकेरीचे सामने गमवाल्याने भारत 2-0 असा पिछाडीवर पडला आहे. तर आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी उर्वरित तीनही सामने भारताला जिंकावे लागतील.

रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांचा पुरुष दुहेरीचा सामना शनिवारी होणार आहे. कोलकाताच्या साऊथ क्‍लब मध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात इटलीच्या अनुभवी आंद्रेज सेप्पीने राजकुमार रामनाथनचा 6-4 आणि 6-2 असा पराभव करत भारताला पहिला धक्का दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पहिल्या सेटमध्ये रामनाथनने कडवी झुंज देत सप्पीला अडचणीत आणले होते; परंतु अखेर अनुभवाच्या जोरावर सप्पीने सेट आपल्या नावे केला. तर दुसरा सेटही 6-2 असा जिंकत सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यात प्रजनेश गुन्नस्वरनला 22 वर्षीय माटीयो बेरींटिनोने पराभूत डेव्हिस कप स्पर्धेत विजयी पदार्पण केले. त्याने हा सामना 6-4, 6-3 असा जिंकत इटलीला 2-0 आघाडी मिळवून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)