Stock Market – इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC) च्या शेअर्समध्ये गेल्या सात सत्रांमध्ये 69 टक्क्यांची जबरदस्त उसळी पाहायला मिळाली आहे. यामुळे कंपनीचे बाजार भांडवल एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. कंपनी 2021 मध्ये सूचीबद्ध झाली होती. त्यानंतर प्रथमच या समभागाचे बाजार भांडवल 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये कंपनीच्या शेअर्सने प्रथमच 10 टक्के अपर सर्किटसह 84.80 रुपयांचा उच्चांक गाठला.
गुंतवणूकदारांना झाला मोठा नफा –
आज या समभागाने 84.80 रुपयांच्या पातळीसह उच्चांक गाठला. या समभागाची इश्यू किंमत 26 रुपये होती. ज्या गुंतवणूकदारांनी या IPO वर सट्टा लावला होता, त्यांनी त्यांचे शेअर्स विकले नसते, तर त्यांचे मूल्य आतापर्यंत तिप्पट झाले असते. या मल्टीबॅगर स्टॉकने या वर्षी जोरदार कामगिरी केली आहे. या वर्षी आतापर्यंत या स्टॉकमध्ये 158 टक्के वाढ झाली आहे.
सरकारने देशातील पायाभूत सुविधांवर खर्च करण्यावर भर दिला आहे. या कारणास्तव, रेल्वेशी संबंधित विविध समभागांमध्ये वाढ होत आहे. IRFC व्यतिरिक्त, यामध्ये RVNL आणि IRCON इंटरनॅशनलचे शेअर्स समाविष्ट आहेत.
2023-24 या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने भारतीय रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद केली होती. रेल्वेसाठी आतापर्यंत केलेली ही सर्वात मोठी भांडवली वाटप आहे. 2013-14 मध्ये यासाठी केलेल्या वाटपाच्या 9 पट आहे.
सोमवारी या शेअरध्येही झाली वाढ –
सोमवारी दिवसभराच्या व्यवहारादरम्यान, रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. त्याचप्रमाणे टीटागड वॅगन्समध्येही पाच टक्के वाढ दिसून आली. त्याचप्रमाणे RailTel Corp, RITES आणि Texmaco Rail मध्ये 2-3 टक्क्यांची वाढ दिसून आली.
गुंतवणूकदारांनी काय केले पाहिजे –
या समभागांबद्दलची भावना मजबूत आहे, परंतु काही बाजार तज्ञ या समभागांबद्दल सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहेत आणि सध्याच्या पातळीवर हे शेअर्स खरेदी करू नका असा सल्ला देत आहेत.
(टीप – शेअर बाजारात गुंतवणूक करताना शेअर बाजार तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)