मुंबई – प्रवीण राऊतचे मित्र असणारे आणि उद्धव ठाकरे यांचे उजवे हात असणाऱ्या संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या पत्नींचे आर्थिक व्यवहार बाहेर आलेले आहेत. आज ईडीने कारवाई करून संजय राऊत यांची अलिबागमधील काही जमीन, संपत्ती आणि दादरमधील एक फ्लॅट जप्त केला आहे.
संजय राऊत यांनी 10 महिन्यांपूर्वी त्यांनी ईडी कार्यालयात जाऊन 55 लाख रुपये परत केले होते. ईडीची काही दिवस कारवाई सुरू होती. आमच्याकडे देखील माहिती येत होती. गेले दोन महिने संजय राऊत यांची धडपड, धावपळ, बोगस पत्र व्यवहार, ईडीवर आरोप करणे, किरीट सोमय्या, निल आणि मेधा सोमय्या यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणे ही मानसिक अवस्था मी समजू शकत होतो, असे किरीट सोमय्या यांनी सांगितलें.
किरीट सोमय्या म्हणाले, पंतप्रधान मोदींनी स्पष्ट सांगितलं होतं की संजय राऊत यांनी 12 पानी पत्र लिहिलं किंवा राज्यसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिलं किंवा मनवानी यांच्या नावाने ईडीचे अधिकारी किरीट सोमय्यांवर आरोप केले तरी कारवाई होईल. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या उद्धट सरकारला वाटत असेल की पोलिसांचा माफियासारखा वापर करून केंद्रीय तपास संस्थांमधील प्रामाणिक अधिकाऱ्यांचं तोंड बंद करता येईल; परंतु कारवाई होणार आहे.