ट्रोलर्सला कसं उत्तर द्यावं? खूप काही शिकवणारा रतन टाटांचा हा किस्सा एकदा वाचाच…

नवी दिल्ली – अनेकदा आपण इतरांनी केलेल्या टीका-टीपण्णीमुळे खचून जात असतो. मात्र, इतरांनी केलेली टीपण्णी देखील कशी सकारात्मकरित्या स्वीकारावी हे आपल्याला प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांच्या एका किस्स्यातून शिकायला मिळेल.

कधी आपल्या चांगल्या कामांमुळे तर कधी जुन्या फोटोंमुळे प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा हे सोशल मीडियावर चर्चेत असतात. रतन टाटा यांच्या इंस्टाग्राम अकाउंटचे एक मिलियन फाॅलोअर्स झाले होते. या आनंदात त्यांनी आपला एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर लोकांनी कमेंट्स आणि लाईकचा पाऊस पाडला. त्यातच एका मुलीने रतन टाटा यांच्या पोस्टवर कमेंटमध्ये ‘छोटू’ लिहिले. यानंतर मुलीला सोशल मीडियावर युजर्सनी ट्रोल करण्यास सुरूवात केली.

येथेही रतन टाटा यांनी आपला उदारपणा दाखवत मुलीचा बचाव केला आणि तिच्या कमेंटला प्रेमाणे प्रत्युत्तर दिले. त्यांनी रिप्लाय देताना म्हटले की, आपल्या सर्वांमध्ये छोट्या मुलांचे गुण असतात, कृपया या मुलीशी आदराने वागा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ratan Tata (@ratantata)


दरम्यान, या मुलीने ट्रोल होताच आपली कमेंट डिलिट केली होती. टाटांनी लिहिले की, काल एका इनोसेंट महिलेने मला छोटू म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या. या कमेंटमुळे त्या मुलीला लोकांनी केलेल्या अपमानाला सामोरे जावे लागले.

यावरून समजते की, रतन टाटांबाबत लोकांमध्ये किती आदर आणि प्रेम आहे. शेवटी त्या मुलीला तिची कमेंट डिलिट करावी लागली. टाटा यांनी लिहिले की, ते तिच्या भावनात्मक कमेंटचा आदर करतात. तिने पुन्हा देखील अशीच कमेंट करावी. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, रतन टाटा यांनी गेल्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये इन्स्टाग्रामवर खाते उघडले होते आणि अल्पावधीतच 3.5 मीलियन फाॅलोअर्सचा टप्पाही पार केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.