अमेरिकेच्या मते; पाकिस्तान दहशतवादी राष्ट्रच

ग्रे यादीतच कायम असल्याने मदत कठीण

वॉशिंग्टन – आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक दलाच्या (एफएटीएफ) ग्रे लिस्ट बाहेर पडण्यासाठी कारवाईचा दिखावा करणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेने झटका दिला आहे. पाकिस्तानला आपला गड बनवलेल्या लष्कर-ए-तोयबाला अमेरिकेने परदेशी दहशतवादी संघटनेच्या यादीत कायम ठेवले आहे. त्या शिवाय पाकिस्तानातील लष्कर-ए-झांग्वीसह सात इतर संघटनांना देखील जागतिक दहशतवादी संघटनेच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. याचा दहशतवादी राष्ट्र असल्याचा शिक्का बसलेला असल्याने सध्या पाकिस्तानला कोणीही मदत देत नाही; तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची बंधनेही पाकिस्तानला महागात पडत आहेत.

पाकिस्तान सध्या एफएटीएफच्या ग्रे यादीत आहे. परंतु दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद थांबवण्यासह मनी लॉंडरिंगवर सूत्री कारवाई योजनेची अंमलबजावणी करणे पाकला बंधनकारक आहे. तसे न झाल्यास पाकिस्तानचा काळ्या यादीत समावेश होऊ शकतो. एफएडीएफच्या शेवटच्या बैठकीत पाकिस्तानने केवळ मुद्यांवर काम केल्याचे स्पष्ट झाले होते.

पाकिस्तान ग्रे यादीतून बाहेर आले नाहीतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बॅंक व युरोपीय संघाची आर्थिक मदत मिळणेही कठीण होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.