‘तो’ खून मैत्रीणीवरुन चिडवण्यातून

पुणे – सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथील मल्हार हॉटेल येथे एका तरुणाचा मृतदेह शनिवारी हवेली पोलिसांना सापडला होता. यश मिलींद कांबळे (18,रा.नांदेड , ता. हवेली) असे मृत तरुणाचे नाव होते. संबंधीत तरुणाचा खून त्याच्याच मित्रांनी मैत्रीणीवरुन चिडवण्याच्या वादातून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी हवेली पोलिसांनी तपास करत चौघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासात घटनेच्या दिवशी यशचे दोन मित्र त्याला घरातून घेऊन गेले होते. यानंतर यश घरी परतला नाही, त्याचा मृतदेहच पोलिसांना सापडला. पोलिसांना घटनास्थळी प्रथम यश इमारतीवरुन पडून मृत पावला असेल अशी शक्‍यता वाटली होती. मात्र तपासात सीसीटीव्ही फुटेज व इतर माहितीवरुन त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने तपास करत त्याला घरातून बाहेर घेऊन गेलेल्यापैकी एकाला मित्रांना अगोदर ताब्यात घेतले.

या गुन्हयात आतापर्यंत चौघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम, पोलीस कॉन्स्टेबल रामदास बाबर, गणेश धनवे, राजेंद्र मुंडे, विश्‍वास मोरे आदींच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.