पुणे,दि.29- गाडीचा धक्का लागल्याने कारचालकाला शिवीगाळ करत गाडीची काच फोडण्यात आली. यानंतर परिसरात शस्त्रे हातात घेऊन दहशत पसरवण्यात आली. याप्रकरणी अफताब उर्फ अफी शेख व त्याचा मित्र समीर यांच्यावर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सनी कुराडे (37,रा.लष्कर) याच्या गाडीचा धक्का आरोफी अफताबला लागला होता. यावरुन चिडून जाऊन त्याने शिवीगाळ करत गाडीची काच फोडली. यानंतर फिर्यादी त्याच्या भावाला घेऊन अफताबकडे जाब विचारण्यासाठी गेला होता. तेव्हा आरोपी व त्याच्या मित्राने लाकडी दांडके व लोखंडी रॉड त्याच्या डोक्यात मारुन जखमी केले.
त्यांना “हम इधरके भाई है’ असे म्हणत हातातील हत्यारे दुकानदार व रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना दाखवत दहशत माजवली. त्यांच्या दहशतीमुळे दुकानदारांनी दुकाने पटपट बंद केली तसेच नागरिकही परिसरातून घाबरुन पळून गेले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत.