Pune Crime : स्थानबध्दतेचा आदेश निघताच झाला फरार; सापडला तब्बल सव्वा वर्षानी

पुणे – स्थानबध्दतेचा आदेश निघताच फरार झालेल्या सराईत गुन्हेगारास तब्बल सव्वा वर्षानी जेरबंद करण्यात यश आले आहे. त्याला सहकारनगर पोलिसांच्या पथकाने इंदापूर तालूक्‍यातील अंथूर्णे येथून अटक केली.

अमित दीपक आरडे (26 रा मल्हार मार्तंड सोसायटी पद्मावती, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरडे हा सराईत गुन्हेगार असून त्याची परिसरात दहशत आहे. कायदा सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी त्याच्या स्थानबध्दतेचा आदेश 16 नोव्हेंबर 2019 रोजी काढला होता.

हा आदेश निघाल्याची माहिती मिळताच तो पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला. पोलिसांनी त्याच्या रहात्या घरी व नातेवाईकांकडे अनेकदा चौकशी केली, मात्र तो मिळून येत नव्हता. दरम्यान पोलीस नाईक प्रकाश मरगजे यांना तो अंथूर्णे येते रहात असल्याची खबर मिळाली होती.

त्यानूसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रकाश मरगजे व भुजंग इंगळे यांचे पथक रवाना झाले. त्यांनी आरडेला ताब्यात घेऊन सहाकारनगर पोलीस ठाण्यात आणले. यानंतर त्याच्यावरील स्थानबध्दतेची कार्यवाही पुर्ण करण्यात आली.

मोक्कातील फरार आरोपीस घातल्या बेड्या-
खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात मोक्का लागल्यावर पळून गेलेल्या आरोपीस सहकारनगर पोलिसांनी शिताफीने पकडले. मोक्का लागल्याचे कळताच तो सातत्याने रहाण्याचे ठिकाण बदलत होता. सोनू उर्फ आनंद सिध्देश्‍वर धडे(20,रा.तळजाई वसाहत) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याने धनंजय अडागळे व दोन अल्पवयीन मुले अशा आठ जणांनी मिळून खूनाचा प्रयत्न केला होता.

या गुन्हयाला पोलिसांनी मोक्का लावला होता. इतर आरोपी मिळून आले मात्र सोनू सापडत नव्हता. पोलीस नाईक एस.जे.ननावरे व पोलीस शिपाई एम.आर.मंडलिक यांना खबर मिळाताच त्याला भिगवण येथून अटक करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.