“अशा” पद्धतीने इंधन दर कमी करावे; रोहित पवारांची मोदी सरकारडे मागणी

मुंबई – देशात इंधन आणि गॅसची सातत्याने दरवाढ होत आहे. या दरवाढीमुळे सर्वच महागलं असून सर्वसामान्यांचं महागाईमुळं कंबरड मोडलं आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची मागणी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकराकडे सातत्याने करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी अनोख्या पद्धतीने दरवाढीचा  निषेध केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारला इंधन दर कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.

विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. या काळात दरवाढीचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यातच रोहित पवार यांनी ट्विट करून पेट्रोल-डिझेलचे दर कमी कसे करता येईल, याविषयी मोदी सरकारला सल्ला दिला. इंधन दरवाढ आटोक्यात आणण्यासाठी त्यावरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा केंद्राचा विचार स्वागतार्ह आहे. मात्र एक्साईजमध्ये राज्यांना वाटा मिळतो. सेसमध्ये मिळत नाही, म्हणून एक्साईजऐवजी सेस कमी करावा. केंद्र सरकार याचा गांभीर्याने विचार करेल, ही अपेक्षा, असं रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी हे ट्विट पंतप्रधान कार्यालय आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना टॅग केलं आहे.


दरम्यान, केंद्र सरकार इंधनावरील उत्पादन शुल्क (excise duty) कमी करण्याच्या पर्यायावर विचार करत आहे. अर्थमंत्रालय त्यावर सकारात्मक विचार करत असून राज्ये, तेल कंपन्या आणि पेट्रोलियम मंत्रालयाशी चर्चा करत आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.