Pune Coronavirus Updates : पुण्यात गेल्या 24 तासात 904 नवीन करोनाबाधित; 7 जणांचा मृत्यू

पुणे – पुण्यात गेल्या 24 तासात 904 नवीन करोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता एकूण करोनाबाधितांची संख्या वाढून 2 लाख 5 हजार 553 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत एकूण 4876 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. 562 डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 1 लाख 94 हाजर 791 वर पोहोचली आहे.

आज गुरूवारी पुणे शहरातील विविध करोना चाचणी केंद्रावर 7585 स्वॅबची तपासणी करण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात विविध रूग्णालायांत ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या 631 इतकी आहे. तर सक्रिय रूग्ण संख्या 5886 इतकी आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 4 लाख 11 हजार 843 झाली आहे. त्यापैकी 3 लाख 91 हजार 247 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अॅक्टीव्ह रूग्णसंख्या 11432 असून एकूण 9173 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के तर मृत्यूचे प्रमाण 2.23 टक्के आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.