Pune Crime | मैत्रिणीनेच साथीदारांच्या मदतीने केला सराईत गन्हेगाराचा ‘खून’; विमानतळ परिसरातील घटना

गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने तासाभरात आवळल्या मुसक्‍या

पुणे – विमानतळ परिसरात शनिवारी रात्री एका सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अवघ्या तासाभरात एका महिलेसह तीघांना अटक केली. सोबत राहण्यासाठी वारंवार त्रास देत असल्याने मैत्रीणीनेच सराईत गुन्हेगाराचा काटा काढला असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आहे आहे.

सुमित जगताप (रा.लोहगाव) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर तीन ते चार गुन्हे दाखल आहेत. तर त्याचा खून केल्याप्रकरणी शबनम हनिफ शेख (रा.लोहगाव), मोहम्मद हुसेन मोहम्मद शरीफ कुरेशी(रा.लोहगाव) व सलीम मुर्तीजा शेख (रा.लोहगाव) अशी यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सुमित जगताप याच्यावर हल्ला झाल्यावर विमानतळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तो जखमी असताना त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान गस्तीवर असलेले गुन्हे शाखा युनिट चारचे पथकही तेथे पोहचले. त्यांनी समांतर तपास सुरु करताच पोलीस हवालदार गणेश साळुंके व पोलीस नाईक राकेश खुणवे यांना आरोपीसंदर्भात खबर मिळाली. त्यानूसार सापळा रचण्यात आला.

दरम्यान, आरोपी खडकी येथील शासकीय दुध योजना येथे कारमधून पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली असता त्यांनी साथीदार सनी गाडे याच्यासह प्राणघातक हल्ला केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) अशोक मोराळे पोलीस उपायुक्त(गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक रजनीस निर्मलयांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे, पोलीस हवालदार गणेश साळुंके, राजस शेख, पोलीस नाईक राकेश खुणवे, प्रविण कराळे, सुरेंद्र साबळे, महिला पोलीस नाईक नेवसे, पोलीस शिपाई सागर वाघमारे

– लेडी डॉनला लोकल डॉनचा त्रास 
आरोपी महिला शबनमनचा व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय आहे. ती स्वत:ला लेडी डॉन समजत होती. तीच्या कारवरही तसेच लिहले होते. तर मयत सुमित हा विमानतळ व लोहगाव परिसरातील स्थानिक गुन्हेगार होता. सुमितला पत्नीने सोडल्याने तो एकटाच रहात होता. त्याची शबनमबरोबर चांगली मैत्री होती. मात्र तो शबनमला सोबत रहा म्हणून वारंवार त्रास देत होता. या कारणावरुन शबनमने लाकडी दांडके व धारदार हत्याराने साथीदारांच्या मदतीने सुमितवर हल्ला केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.