मुंबई – राज्यात करोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. अशात करोना रुग्णांची आजची संख्या टेन्शन वाढवणारी आहे. आज राज्यात 6 हजार 159 नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या 17 लाख 95 हजार 959 इतकी झाली आहे. राज्यात मागील 24 तासांमध्ये 65 मृत्यूंची नोंद झाली आहे.
मागील चोवीस तासांमध्ये 4 हजार 844 रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.
आत्तापर्यंत एकूण 16 लाख 63 हजार 723 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 92.64 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 4 लाख 56 हजार 962 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 17 लाख 95 हजार 959 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात 5 लाख 29 हजार 344 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर 6 हजार 980 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला 84 हजार 464 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.