नवी दिल्ली – जागतीक संकेतानुसार गुरुवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात अल्प वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर नऊ रुपयांनी वाढून 46,981 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
तयार चांदीचा दर 902 रुपयांनी कमी होऊन 67,758 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक चलन बाजारात रुपया घसरणीवर आहे. आज रुपयाचे मूल्य 17 पैशांनी कमी झाले. त्याचाही परिणाम धातू बाजारावर झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,807 डॉलर तर चांदीचा दर 26 डॉलर प्रति औंस या पातळीवर आहे. अमेरिकेच्या रोख्यावरील परतावा कमी होत आहे. त्याच बरोबर डॉलर कमकुवत होत आहे. या कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात काही प्रमाणात वाढ होत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.