पुणे प्रतिनिधी – पुणे शहरात काेराेना विषाणूने बाधित झालेला पाहिला रुग्ण मिळाल्यापासून साेशल मिडियावर अनेक बातम्या, पाेस्ट, व्हिडीओ, आॅडिओ क्लिपस, फाेटाे प्रसिध्द हाेत आहे. यामध्ये काेराेना विषाणूच्या संर्दभाने खाेटया बातम्या, अफवा पाठवले जात असल्याचे पाेलीसांचे नजरेस आले आहे. त्यामुळे अशाप्रकारे काेणी मेसेज पुढे पाठवू नये किंवा तयार करु नये अन्यथा सायबर गुन्हे शाखेमार्फेत अशा लाेकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती पाेलीस उपआयुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे.
फेसबुक, टिव्टर, इन्सटाग्राम, व्हाॅटसअप अशा साेशल मिडियावर अधिकतर गाेष्टी खाेटया अाहे जसे की, काेराेना विषाणू पासून वाचण्याचे घरगुती, आयुर्वेदिक उपाय, काेराेना विषाणू बाधित लाेकांची संख्या, त्यांची नावे, त्यांचे संर्पकात आलेल्यांची यादी, काेराेना विषाणूवर आधारित तज्ञ व्यक्तींची मते, फाेटाे, आडिओ क्लिपस, व्हिडिओ, सरकारने जाहीर केलेले लाॅकडाऊन संबंधातील सुचना व कालावधी याबाबत चुकीची माहिती, काेराेना विषाणू संर्दभाने जातीय, धार्मिक तेढ वाढेल असे मेसेज पसरवणे, काेराेना विषाणूने ग्रस्त असणारे लाेकांचे फाेटाे, व्हिडीओ, आॅडिओ स्वरुपात प्रसारित करणे, काेराेना विषाणु संर्दभात लाेकात भितीचे वातावरण निर्माण होईल असे मेसेज प्रसारित करणे. अशापध्दतीचे मेसेज आले असतील तर ते पुढे काेणाला पाठवू नका असे आवाहन पाेलीसांनी केले आहे. अन्यथा भा.दं.वि. कलम 18, 5050 (2) तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 (1) (ब), 54 अन्वये कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे.