मांडवगण फराटा-वडगाव रासाई (ता. शिरूर येथील) रासाई देवीची या वर्षीची (दि. 8 व 9 रोजी) होणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला आहे. नागरिकांनी यात्रेच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य हा बुधवारी (दि. 8) घरच्या देवास दाखवावा. संचारबंदीमुळे पालखीचा कार्यक्रम रद्द झालेला आहे. गावात पोलीस यंत्रणा तैनात असल्यामुळे गावात कोणी दर्शनासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केले आहे.