पळसदेव-लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. अगदीच महत्वाची कामे वगळता इतर कामे पुढे ढकलली जात आहेत. पळसदेव भागात सर्वच सलूनची दुकाने बंद आहेत. त्यामुळे वाढलेले केस कापण्यासाठी ग्रामीण भागातील युवक घरीच ज्येष्ठ नागरिक व इतर नागरिकांची दाढी व कटिंग करत आहेत. पळसदेव शेलारपट्टा येथील जय हनुमान मित्र मंडळाच्या वतीने वस्तीवरील नागरिकांची मोफत दाढी व केस कापून दिले जात आहेत.