Corona Updates | पुरंदरचा आकडा दिवसात 150 पार

वाल्हे (पुणे) – पुरंदर तालुक्‍यात सोमवारी (दि. 5) करोना बाधितांचा आकडा 150 पार गेला असून 162 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात सासवड, जेजुरी शहरात मिळून 99 बाधित आढळून आले आहेत.

सासवड येथील शासकीय लॅबमध्ये 269 संशयितांपैकी सासवड (80), ग्रामीण भागातील भिवडी (8), भिवरी (4), पिसर्वे, दिवे, पिसे, शिवरी, टेकवडी, काळेवाडी, वाघापुर, उदाचीवाडी (प्रत्येकी 2), एखतपूर, ढुमेवाडी, सोनोरी, कुंभोशी, वीर, पिंपळे, झेंडेवाडी, सिंगापूर, माळशिरस, कोडित, वाळुंज, वनपुरी, चांबळी, सटलवाडी (प्रत्येकी 1) असे 124.

तर जेजुरी येथील शासकीय लॅबमध्ये घेतलेल्या 88 संशयितांपैकी जेजुरी (19), वाल्हा (5), कोळविहिरे (3), साकुर्डे (2), नाझरे, सुकलवाडी, बेलसर, धालेवाडी, भोसलेवाडी, मावडी, मांडकी, हरणी, जोगवडी (प्रत्येकी 1) असे 38 दोन्ही मिळून एकूण 162 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.