जयपूर – थायलंड येथील पटाया येथे 17 आणि 18 डिसेंबर रोजी 39 वी आंतरराष्ट्रीय बाॅडीबिल्डिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत राजस्थानच्या महिला बाॅडीबिल्डरने देशासाठी गोल्ड मेडल जिंकून आणलं आहे. प्रिया सिंग असे या बाॅडीबिल्डर तरूणीचे नाव आहे. या कामगिरीमुळे प्रियावर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र सरकारने तिला कसलीही मदत न केल्याचा ठपका ठेवण्यात येत आहे.
प्रिया सिंग ही दलित समाजातील असल्याचे सांगितले जात आहे. ‘बाबासाहेबांच्या मुलीने देशाचे नाव उज्ज्वल केलं, देख रहे हो मनू.., गुलामीच्या बेड्या तोडून तिने इतिहास रचला’ अशा आशयाच्या पोस्ट देखील सोशल मीडियामध्ये शेअर केल्या जात आहेत.
दरम्यान, प्रिया सिंगने आंतरराष्ट्रीय पातळीवरील पदक जिंकूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राजस्थानच्या अशोक गहलोत सरकारने तिचा सन्मान केला नसल्याची माहिती समोर येत आहे. थायलंडहून परतल्यानंतर ती एअरपोर्टवरुन घरी एकटीच गेली होती. एका मुलाखतीमध्ये प्रिया सिंगने जातीवादामुळे भेदभाव होत असल्याचे नमूद केले आहे. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी ट्विट करुन सरकारने प्रिया सिंगच्या प्रतिभेचा सन्मान केला नसल्याची खंत व्यक्त केली केली आहे. दलित असल्यामुळे प्रियावर अन्यात होत असल्याचा सूर सोशल मीडियामध्ये उमटत आहे. प्रियाने या सगळ्या पोस्ट तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केल्या आहेत.
राजस्थान की प्रथम महिला बॉडीबिल्डर ने गोल्ड जीतकर देश का गौरव बढ़ाया.@Priya_SinghB ने थाईलैंड में आयोजित 39वीं अंतर्राष्ट्रीय महिला बॉडीबिल्डिंग प्रतियोगिता में गोल्ड व प्रो. कार्ड जीतकर देश का नाम रोशन किया है। लेकिन सरकार की ओर से इस प्रतिभा को कोई सम्मान नहीं मिला। शर्मनाक pic.twitter.com/NQzZt62wO2
— Chandra Shekhar Aazad (@BhimArmyChief) December 25, 2022
राजस्थानच्या पहिल्या महिला शरीरसौष्ठवपटूने सुवर्णपदक जिंकून देशाचा गौरव केला. प्रिया सिंगने थायलंडमध्ये झालेल्या ३९व्या आंतरराष्ट्रीय महिला शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्ण आणि प्रो. कार्ड जिंकून देशाचे नाव उंचावले आहे. मात्र या प्रतिभेला शासनाकडून सन्मान मिळाला नाही हे लाजिरवाणे आहे. असे ट्विट चंद्रशेखर आझाद यांनी केले आहे.