प्रथम महापौर फुलसौंदरांसह दोघांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल

नगर – शिवसेनेचे प्रथम ahmedn यांच्यासह चार जणांविरूद्ध विनयभंगाची व ऍट्रोसीटीची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान फुलसौदर, गणेश फुलसौदर, महेश फुलसौदर, अरुण फुलसौदर (सर्व रा. बुरुडेमळा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नावे आहेत.

सोमवारी (दि.12) सायंकाळी 4.30 वाजता बुरुडगाव येथील पडीकरान परिसरात पिडीत महिला या शेळ्या चारण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी यांनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून तेथे आले. तुला व तुझे कुटुंबियांना आमचे सोबत असलेला जागेचा वाद मिटवायाचा आहे की नाही? असे म्हणून आरोपी यांनी पिडीतेला लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. डोक्‍यावर मारहाण केल्यामुळे पिडीत महिला बेशुद्ध पडली. गणेश फुलसौदर व महेश फुलसौदर यांनी महिलेवर अत्याचार केला. तू जर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली तर तु व तुझ्या कुटुंबाला जीवे मारू असे फिर्यादीत म्हटले आहे.

जागेच्या वादातून फुलसौंदरवर खोटा गुन्हा: आ.जगताप

शहराचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर व इतरांवर जागेच्या वादातून खोटा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याबाबत योग्य ती चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

आ. जगताप यांनी पत्रात म्हटले की, फुलसौंदर हे राजकीय व सामाजीक क्षेत्रात काम करतात. ऐतिहासिक नगर शहराचे प्रथम महापौर म्हणून त्यांनी पद भुषवलेले आहे. व त्यांचे समाजात चांगले स्थान आहे. त्यामुळे त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला आहे. त्याबाबत योग्य ती चौकशी करावी. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याचीही जिल्हा पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी. एखाद्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, व्यापारी, प्रतिष्ठीत व्यक्ती यांची कारकीर्द संपविण्याच्या दृष्टिने असले प्रकार घडण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. त्यामुळे भगवान फुलसौंदर यांच्यावर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याबाबत योग्य ती चौकशी करावी, असे पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×