पुणे – हाऊस बोटचा सफारीसाठी आता काश्मीर आणि केरळला जाण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. राज्यातील धरणांमध्येही लवकरच नागरिकांना हाऊस बोटचा आनंद घेता येणार आहे. ही संकल्पना प्रत्यक्ष साकार करण्यासाठी सरकारने एक पाऊस उचले आहे.
धरणांमध्येही हाऊस बोट सफारी उपलब्ध करून देण्याचा विचार राज्य शासन करत आहे. जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील धरणांमध्ये नौकाविहार, हाऊस बोट, पॉवरसेलिंग व पॅरासेलिंग, साहसपूर्ण खेळ यांना परवानगी देण्याची कार्यपद्धत यासाठीची नियमावली आणि दरनिश्चितीमध्ये सहजता आणि सुटसुटीतपणा आणण्यासाठी शासनाने समिती नेमली आहे. नौकानयनामुळे पर्यटनास चालना मिळून प्रकल्पग्रस्तांना व स्थानिक बेरोजगारास रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.