मुंबई – बॉलीवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाने भलेही इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले नसले तरी ती सतत कोणत्या-न-कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते.
नव्याचे नाव आतापर्यंत अनेक सेलेब्ससोबत जोडण्यात आले आहे. जावेद जाफरीचा मुलगा मीजान जाफरीला नव्या अनेक दिवसांपासून डेट करत असल्याची चर्चा होती.
आता नव्याचे नाव बॉलीवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीशी जोडण्यात येत आहे. नव्या आणि सिद्धांत हे रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांच्या या रिलेशनशिपची सर्वत्र चर्चा रंगत असून सिद्धार्थच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
दुसरीकडे नव्या आणि सिद्धार्थकडून याबाबत कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.
मात्र, सोशल मीडियावर दोघे जण एकमेकांना डेट करत असल्याचे वृत्त व्हायरल होत आहे. नव्याचे आजोबा अमिताभ बच्चन हे सिद्धांतच्या अभिनयाचे चाहते आहेत. जेव्हा “गली बॉय’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता, तेव्हा त्यांनी सिद्धांतला विशेष बुके पाठविला होता.
दरम्यान, नव्या ही श्वेता नंदा आणि निखिल नंदा यांची मुलगी आहे. ती सतत आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर चाहत्यांशी शेअर करत असते. नव्याचे नाव मीजान जाफरी आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानशी जोडण्यात आले होते.