अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री गौतमी देशपांडे ही जोडी ‘स्टोरीटेल मराठी’वर आली आहे. ‘जस्ट फ्रेंड’ असताना एकमेकांसोबत कसं राहावं? आपल्या भावना कशा व्यक्त कराव्यात?
यासाठी त्यांनी नव्या तरुणाईच्या मनाची इत्यंभूत माहिती असणाऱ्या प्रख्यात लेखिका सायली केदार आणि गौरी पटवर्धन यांच्याकडून शाब्दिक मदत घेतली आहे. त्यांच्या प्रेमाचा हा सुपर रोमॅंटिक चटकदार, खुसखुशीत ऑडिओ ड्रामा स्टोरीटेल मराठीने आपल्या ऑडिओ बुकमध्ये रेकॉर्ड केला आहे.
‘जस्ट फ्रेंड’ या नव्या कोऱ्या ऑडिओ ड्रामाच्या निमित्ताने ललित प्रभाकर आणि गौतमी देशपांडे ही जोडी एकत्र आली आहे. मैत्री, मैत्रीतले नाते, त्यांच्यातील रुसवे-फुगवे, प्रेम आणि प्रेमातील तरलता, त्यासोबत असलेली डिपेन्डन्सी अशा अनेक प्रेमळ नाजूक क्षणांचे सूक्ष्म निरीक्षण करून या व्यक्तिरेखा खुलविण्यासाठी या जोडगोळीने विशेष मेहेनत घेतली आहे.
या कथेतील व्यक्तिरेखा ते पुरेपूर जगले आहेत. स्वतंत्रपणे लिखाण करणाऱ्या लेखिका सायली केदार आणि गौरी पटवर्धन या दोन प्रतिभावंत लेखिका ‘जस्ट फ्रेंड’ नव्या ऑडिओ सीरिज निमित्तानं प्रथमच एकत्र आल्या आहेत. स्टोरीटेलवर कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओ बुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर 11 प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून ‘साहित्य श्रवणानंद’ घेता येईल.