दुबई – क्रिकेटच्या मैदानावर अप्रतिम कामगिरी करणाऱ्या प्रत्येक महिन्यातील मानकरी खेळाडूंना आयसीसीने पुरस्कार देणे सुरु केले आहे. त्यातील या महिन्याचे मानकरी ठरले आहेत इंग्लंडची सोफी इक्केलस्टोन व न्यूझीलंडचा नवोदित फलंदाज डेव्हन कॉनवे.
एका पुरुष आणि महिला खेळाडूला पुरस्काराने सन्मानित केले जाते. या पुरस्कारासाठी प्रेक्षकही मतदान करु शकतात. त्यासाठी काही महिनाभरातील खेळाच्या जोरावर खेळाडूंना नामांकन देते. त्यानंतर समीक्षक व प्रेक्षकांच्या ऑनलाईन मतदानाद्वारे विजयी खेळाडू ठरवला जातो.
महिला गटात इंग्लंडच्या सोफी इक्लेस्टोनने हा पुरस्कार मिळवला आहे. तर, पुरुष गटात न्यूझीलंडचा नवोदित आक्रमक फलंदाज डेवन कॉनवेने हा पुरस्कार पटकावताना आपल्याच देशाच्या काएल जेमिसन आणि दक्षिण आफ्रिकेचा कॉन्टन डिकॉक यांना मागे टाकले.