वेलिंग्टन – आयसीसीच्या 2019 सालच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अनाकलनीय नियमांच्या आधारे इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. त्याची सल न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंना आजही असल्याचे एका घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत इंग्लंडला इटलीकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंनी इंग्लंडच्या फुटबॉल संघाला टोमणे मारले आहेत.
युरो स्पर्धेतील अंतिम फेरीत इंग्लंडला इटलीकडून पराभव सहन करावा लागल्यानंतर न्यूझीलंच्या खेळाडूंना टोमणा मारण्यास सुरुवात केली आहे. या स्पर्धेत इटलीने पेनल्टी शूटआउटमध्ये इंग्लंडचा पराभव केला. त्यानंतर न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिस आणि जिमी नीशम यांनी इंग्लंडला टोमणा मारत विश्वकरंडक स्पर्धेत झालेल्या विजयाबद्दल आनंद नव्हे खंत व्यक्ती केली.
अंतिम फेरीचा निकाल माझ्या समजण्यापलीकडे आहे. इंग्लंडने जास्त कॉर्नर केले होते. अर्थात नियमांचा आधार घेत समोरच्या संघाला कॉर्नर करण्यात ते माहिर आहेतच, असा टोमणा स्टायरिसने मारला. नीशमनेही इंग्लंडला पेनल्टी शूटआउट का घेतले. सर्वात जास्त पास देणाऱ्या संघाला विजयी घोषित का केले नाही, असा टोला इंग्लंड संघासह आयसीसीलाही मारला आहे.
2019 सालच्या क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला होता. त्यानंतर सुपर ओव्हरमध्येही सामना ड्रॉ झाला होता. त्यानंतर आयसीसीच्या नियमानुसार सर्वात जास्त चौकार मारणाऱ्या इंग्लंड संघाला विजयी घोषित करण्यात आले होते. आयसीसीच्या या नियमावरून क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर हा नियम बदलण्यात आला होता.