हॅमिल्टन – केन विलियमसनयाच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत प्रथमच अव्वल स्थान मिळवले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये न्यूझीलंडचा 101 धावांनी विजय झाला. यंदाच्या वर्षातील त्यांचा हा सलग पाचवा कसोटी विजय आहे.
यावर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडने भारताचा कसोटी मालिकेत 2-0 असा पराभव केला होता. भारताने मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याचा फायदाही न्यूझीलंडला झाला असून त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया दसऱ्या तर भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे. ही क्रमवारी पारंपरिक कसोटी क्रमवारी असून आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची क्रमवारी भिन्न आहे.
आयसीसीने कसोटी क्रिकेटमधील विजय व पराभवानंतर क्रमवारी जाहीर करताना संघांची टक्केवारीदेखील लक्षात घेतली आहे. न्यूझीलंडने पाकिस्तान विरुद्धच्या कसोटीनंतर इतिहासात प्रथमच क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे.
भारत दुसऱ्या स्थानी
मेलबर्नवर विजय मिळवत भारताने आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत दुसरे स्थान कायम राखले आहे. भारताच्या खात्यात 30 गुणांची भर पडली असून एकूण गुणसंख्या 390 झाली आहे. बॉक्सिंग डे कसोटी गमावल्यानंतरही ऑस्ट्रेलियाने 322 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे.