लाहोर – पाकिस्तानचा आक्रमक फलंदाज शाहिद आफ्रिदी अनेक वर्षे 17 वर्षांचाच होता, असे काही वर्षांपूर्वी गंमतीने म्हटले जायचे. त्यातील तथ्य आसल्याचा खुलासा त्यांच्याच महंमद आसिफनेचे केला आहे.
पाकिस्तान संघातील गोलंदाज वयचोरी करतात. ते फक्त कागदावर तरुण आहेत. मात्र वास्तविकपणे त्यांचे वय जास्त असते. पाकिस्तानच्या गोलंदाजाचे कागदावरचे वय 17-18 असते. मात्र त्यांचे खरे वय 27-28 वर्ष असते, असा खळबळजनक आरोप महंमद आसिफने केला आहे.
सध्याच्या काळात पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीची धार बोथट झाली आहे. गेल्या 5-6 वर्षात एकाही गोलंदाजाला कसोटी सामन्यात 10 बळी घेता आलेले नाहीत. पाच-सहा षटके टाकल्यानंतर या नव्या दमाच्या गोलंदाजांना क्षेत्ररक्षणासाठीही उभे राहता येत नाही, इतकीच त्यांतंदुरुस्ती टीकते. सध्याच्या पाकिस्तानी गोलंदाजाकडे पुरेसा अनुभव नाही.
पाकिस्तानला वासिम अक्रम, वकार युनुस, शोएब अख्तर यांच्यासारख्या गोलंदाजाची गरज आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट मंडळ त्याबाबत सध्या काहीही प्रयत्न करताना दिसत नाही, असा आरोपही आसिफने केला.