नवी दिल्ली – भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह आणि गोलरक्षक पीआर श्रीजेश यांच्यासह संभाव्य संघातील 33 खेळाडू तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर 5 जानेवारीपासून बंगळुरू येथे सुरू होणाऱ्या राष्ट्रीय शिबिरात सराव करणार आहेत. या शिबिराचे आयोजन भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय) कॅम्पसमध्ये करण्यात आले आहे.
साई आणि हॉकी इंडियाच्या स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) नुसार सर्व खेळाडूंना प्रशिक्षणापूर्वी 14 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड म्हणाले, “तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर खेळाडू मानसिक व शारीरिकरित्या परत येतील, अशी मला अपेक्षा आहे.
दरम्यान, भारतीय हॉकी संघाने गतवर्षी ऑगस्ट ते 12 डिसेंबरपर्यंत सराव केला होता. तसेच एफआयएच हॉकी प्रो लीग स्पर्धेत 22 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. दुसरीकडे भारतीय महिला हॉकी संघ या महिन्यात अर्जेंटिनाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात 8 सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे.
संभाव्य खेळाडूंची यादी :
गोलकीपर – पीआर श्रीजेश, कृष्णा बी. पाठक आणि सूरज करकेरा., डिफेंडर – बीरेंद्र लकडा, रूपिंदर पाल सिंह, सुरेंद्र कुमार, अमित रोहिदास, कोथजीत सिंह, हरमनप्रीत सिंह, गुरिंदर सिंह, जरमनप्रीत सिंह, वरुण कुमार, दिप्सान टिर्की आणि नीलम संदीप., मिडफिल्डर्स – मनप्रीत सिंह, चिंगलेनसाना सिंह कंगुजम, नीलकांत शर्मा, सुमित, जसकरन सिंह, राजकुमार पाल, हार्दिक सिंह आणि विवेक सागर प्रसाद., फॉरवर्ड – एसव्ही सुनील, आकाशदीप सिंह, मनदीप सिंह, ललित उपाध्याय, रमनदीप सिंह, सिमरनजित सिंह, शमशेर सिंह, गुरजंत सिंह, दिलप्रीत सिंह, गुरसाहिजजित सिंह आणि शिलानंद.