New Zealand Khalistani : न्यूझीलंडमधील ऑकलंड येथील लोकप्रिय रेडिओ होस्ट हरनेक सिंग यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन खलिस्तानी दहशतवाद्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका ऑस्ट्रलियाच्या वृत्तपत्रानुसार,सर्वजीत सिद्धू, सुखप्रीत सिंग आणि एक अनोळखी 48 वर्षीय ऑकलंड रहिवासी हरनेक सिंग यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी आढळले. खलिस्तानी विचारसरणीच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे हरनेक सिंग यांच्या हत्येचा प्रयत्न या तिघांनी मिळून केला होता.
न्यूझीलंडमधील तीन खलिस्तानी दहशतवाद्यांनी हरनेक सिंगवर जीवघेणा हल्ला करण्याची योजना आखली होती. 23 डिसेंबर 2020 रोजी त्याने हा हल्ला केला होता. त्यादरम्यान हरनेक सिंगवर चाकूने 40 हून अधिक वेळा वार केला होता. त्यातून ते कसे तरी बचावला होता. आणि त्यावेळी त्याला 350 हून अधिक टाके आणि अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या.
ऑकलंड न्यायालयाने दोषींना शिक्षा सुनावताना, ‘यातून धार्मिक कट्टरतेची सर्व लक्षणे दिसून येतात. या संदर्भात शिक्षेसाठी वेगळा दृष्टिकोन आवश्यक आहे. पुढील हिंसाचारापासून समाजाचे रक्षण करण्यावर भर दिला पाहिजे. द ऑस्ट्रेलिया टुडेच्या रिपोर्टनुसार, हरनेक सिंग हे नेक्की म्हणून ओळखले जाते. हल्ल्याच्या दिवशी तिन्ही आरोपींनी त्याचा कारमधून पाठलाग केला.
हल्ल्यादरम्यान दोषींनी हरनेकच्या पोटात वार केले. मात्र, हरनेक सिंगने आपल्या कारचे दरवाजे बंद केले आणि कारचा हॉर्न वाजवून आसपासच्या लोकांना सावध केले. यानंतर लोक घरातून बाहेर आले आणि त्यांनी हरनेक सिंगला तातडीने रुग्णालयात नेले.