दुबई –आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य लढतीत न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. या कामगिरीसह त्यांच्या नावावर एक अनोखा विक्रम जमा झाला आहे. आयसीसीच्या सलग तीन स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवणारा न्यूझीलंड पहिलाच संघ ठरला आहे.
न्यूझीलंडने 2019 सालच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. त्यात त्यांना इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता.
त्यानंतर त्याच वर्षी झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही त्यांनी अंतिम फेरी गाठली होती.
या फेरीत त्यांनी भारताचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर आता यंदाच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतही त्यांनी अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडच पहिलाच संघ ठरला आहे. आता टी-20 विश्वकरंडकाचेही विजेतेपद ते मिळवणार का? याचीच उत्सुकता आहे.