मुंबई – एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे प्रकरणाचा तपास करणारे मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे सासरे आणि उद्योजक पद्माकर मुळे यांच्यावर ईडीची रेड पडल्याचं समोर आलं आहे.
औरंगाबाद शहरातील मोठे उद्योजक म्हणून पद्माकर मुळे प्रसिद्ध आहेत. त्याच्यावर ईडीची रेड पडल्याचे स्पष्ट झालं आहे. समीर वानखेडे प्रकरणाचा तपास नांगरे पाटलांकडे आल्यानंतरच ईडीची त्यांच्या सासऱ्यांवर कारवाई झाल्याच्या चर्चा आता जोर धरत आहे.
औरंगाबाद शहरातील बियाणे उत्पादक व्यावसायिकावर ईडीची धाड पडली आहे. बियाणे उत्पादक व्यावसायिक पद्माकर मुळे असे त्यांचे नाव असून ते शहरातले सरकारी ठेकेदार आहेत. तसेच संबंधित व्यावसायिक हे विश्वास नांगरे पाटील यांचे सासरे असल्याचं सांगण्यात येत आहे.
मागील अनेक दिवसांपासून समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात वाद पेटला आहे. मलिक यांनी केंद्रीय संस्थेला लक्ष्य केल आहे. त्यानंतर ईडी अधिकच सक्रीय झाल्याचं बोलल जात आहे. मलिक यांच्या अखत्यारित येत असलेल्या वक्फ बोर्डाच्या जमिनींवरून देखील ईडीने आक्रमक पावित्रा घेतला आहे.