वेलिंग्टन – यजमान न्युझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध अवघ्या एका धावेने नाट्यमय विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडला फॉलोऑन दिला होता, त्यानंतरही कर्णधार केन विल्यमसनच्या अफलातून शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने सामन्याचे चित्रच पालटवले.
The end of a thrilling five days in Wellington. Neil Wagner (4-62) stars with the ball on the final day at the Basin Reserve. The Series drawn 1-1. Catch up on the scores | https://t.co/i5aMjAngcf. #NZvENG pic.twitter.com/8Cr2dCmZ28
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 28, 2023
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा इंग्लंडला फलंदाजी दिली. इंग्लंडने हॅरी ब्रुक्स 186 व ज्यो रुट 153 यांच्या खेळीच्या जोरावर आपल्या पहिल्या डावात 8 बाद 435 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडचा पहिला डाव 209 धावांवर संपवला व त्यांना फॉलोऑनही दिला. यानंतर मात्र, न्युझीलंडच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजीचा समर्थपणे सामना केला.
कर्णधार केन विल्यसनने 132 धावांची खेळी केली. तर टॉम ब्लंडलने 90 व डॅरेल मिशेलने 54 धावांची खेळी केली. यांच्या जोरावर न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या डावात 483 धावा करताना इंग्लंडसमोर विजयासाठी 257 धावा करण्याचे आव्हान ठेवले.
मात्र, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी मिळवलेल्या बळींच्या जोरावर इंग्लंडचा दुसरा डाव 256 धावांवर संपवला व हा सामना अत्यंत रोमहर्षक पद्धतीने अवघ्या एका धावेने जिंकला. या विजयासह नंयूझीलंडने दोन सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली.
संक्षिप्त धावफलक –
इंग्लंड पहिला डाव – 87.1 षटकांत 8 बाद 435 घोषित. (हॅरी ब्रुक्स 186, ज्यो रुट 153, मॅट हेनरी 4-100, मायकल ब्रेसवेल 2-54).
न्यूझीलंड पहिला डाव – 53.2 षटकांत सर्वबाद 209 धावा. (टीम साऊदी 73, टॉम ब्लंडल 38, टॉम लॅथम 35, हेनरी निकोल्स 30, स्टुअर्ट ब्रॉड 4-61, जेम्स अँडरसन 3-37, जॅक लिच 3-80).
न्यूझीलंड दुसरा डाव – 162.3 सर्वबाद 484 धावा. (केन विल्यमसन 132, टॉम ब्लंडल 90, टॉम लॅथम 83, डेव्हन कॉनवे 61, डॅरेल मिशेल 54, जॅक लिच 5-157).
इंग्लंड दुसरा डाव – 74.2 षटकांत सर्वबाद 256 धावा. (ज्यो रुट 95, नेल वॅगनर 4-62, टीम साऊदी 3-45, मॅट हेनरी 2-75).