अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार संधी; मध्य प्रदेश सरकारची नवी योजना

भोपाळ – मध्य प्रदेशच्या माध्यमिक शिक्षण परीक्षांमध्ये कमी गुण प्राप्त झालेल्या किंवा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता निराश होण्याची गरज नाही. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी देण्यासाठी रुक जाना नहीं’ योजनेंतर्गत 6 जूनपासून परीक्षा देता येईल.

योजनेंतर्गत एका वर्षात जून, सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता विद्यार्थ्यांच्या पालकांनी, संस्थाचालक व शिक्षण तज्ज्ञांनी राज्यसरकारला आवाहन केल्यानंतर राज्यसरकारने सर्व परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.