पिंपरी – पायी चालत जाणाऱ्या इसमाला रिक्षाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात इसमाचा मृत्यू झाला आहे. ही घटना भोसरी येथील इंडियन ऑईल पेट्रोलपंपासमोरील रस्त्यावर 20 मे रोजी सांयकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. शामराव विठ्ठलराव बिराजदार (वय-42) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अशोक पवार यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, शामराव दि. 20 मे रोजी भोसरी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोरुन पायी चालत जात असातना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात रिक्षाचालकाने त्यांना धडक दिली. यामध्ये शामराव गंभीर जखमी झाले व त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अज्ञात रिक्षाचालकाचा भोसरी पोलीस शोध घेत आहेत.