सेंच्युरीयन – भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा अव्वल खेळाडू क्वांटन डीकॉक याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, आता त्यावरून नवनव्या चर्चांना उधाण आले आहे.
कुटुंबासाठी वेळ देता यावा यासाठी हा निर्णय घेतल्याचे जरी डीकॉकने सांगितले असेल तरीही दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाशी त्याचे बिनसल्याची चर्चा आहे.
वर्णद्वेषाविरुद्धच्या मोहिमेतून अंग काढून घेतल्यानेच त्याच्यावर टीका सुरु झाली होती व मंडळातील काही पदाधिकारीही त्याच्यावर नाराज होते. यातूनच त्याने हा टोकाचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.