करोना मुक्त 138, मृत्यू 12, रुग्णसंख्या 2799 वर पोहोचली.
शिराळा (प्रतिनिधी) – सांगली जिल्ह्यात आज 156 नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्याची रुग्णसंख्या 2799 वर पोहोचली आहे. तर बरे झालेले रुग्णसंख्या 1266 आहे. आणि 1443 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील 90 रुग्णांचा मृत्यू झालाअसून 138 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 1036, शहरी भागातील 208, मनपा क्षेत्रातील 1555 रुग्ण अशी आहे. ग्रामीणपेक्षा मनपा क्षेत्र रुग्णसंख्येत आघाडी घेऊ लागले आहे. आजच्या नवीन पॉझिटिव्हमध्ये आटपाडी तालुका 3, जत तालुका 2, कडेगाव तालुका 7, कवठेमहांकाळ तालुका 11, खानापूर तालुका 1, मिरज तालुका 19, शिराळा तालुका 3, तासगाव तालुका 17, वाळवा तालुका 1, सांगली 73, मिरज 19 अशी आहे.