चांदा (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील चांदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा ओटा मद्यपीचा अड्डा बनला आहे. त्यामुळे शाळेतील बालचमूची कूचंबना होत आहे. ज्या ठिकाणी ज्ञानदानाचे पवित्र धडे गिरविले जातात. बालपणी शिक्षणाचे संस्कार तिथे घडवल्या जातात. ज्या शिक्षणामुळे या शाळेत शिक्षण घेणारे बाल चमू वरिष्ठ अधिकारी बनतात. त्याच ज्ञानदानाच्या शाळेमध्ये काही चांदा गावातील काही मद्यपी शाळेच्या पडवीतील ओट्यावर सायंकाळी सहानंतर व सुट्टीच्या दिवशी बसतात व मद्यप्राशन करतात.अनेक प्रकारच्या नशा या ठिकाणी करतात.
काही ठिकाणी शाळेच्या आवारामध्ये दारूच्या बाटल्या फोडलेल्या असतात तर काही ठिकाणी गांजा सारखी नशा करून बिड्याचे तुकडे काडेपेटीतील काड्या व ओढलेल्या गांज्याची राख त्या ठिकाणी पडलेली असते एवढ्यावरच हे मद्यपी न थांबता नको तिथे लघवी करतात यामुळे शाळेमध्ये येणाऱ्या बालचमू विद्यार्थ्यांची व शिक्षकांची यामुळे फार मोठी कुचंबना होते. शाळेतील या बालचमूनी समजायचे का असा प्रश्न आता चांदा ग्रामस्थ व पालकांना सतावत आहे.
पोलीस निरीक्षकांना आव्हान
मागील आठवड्यामध्ये चांदा बाजारतळावर सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी अवैध व्यवसाय बंद करणार असे ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या निषेध सभेमध्ये बोलून दाखविले होते. त्यांच्याच शब्दात त्यांना मिळालेले हे मद्यपीकडून उत्तर आहे असे तर नाही ना?