नवी दिल्ली – युक्रेन युद्धामुळे अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांचा सामना करत असलेला रशिया कच्च्या तेलासाठी नवीन ग्राहकांच्या शोधात आहे. त्याच वेळी, आपल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार, भारत रशियासोबत क्रुड ऑईलसाठी करार करण्याची शक्यता आहे. ज्यामुळे केवळ महाग क्रूडचा भार कमी होणार नाही तर रुपयाचे मूल्यही वाढेल. या सर्व कारणांमुळे भारत रशिकडून क्रूड ऑईल घेण्याच्या जवळ आहे.
रशियन क्रूड डीलमध्ये विशेष गोष्ट अशी आहे की, डॉलरऐवजी तेलाचे पैसे भारतीय रुपये आणि रशियन रूबलमध्ये दिले जातील. त्याचबरोबर भारतीय बंदरात कच्चे तेल पाठवताना शिपिंग आणि विम्याची जबाबदारीही रशिया उचलेल.
रशियावर इंटरनॅशनल पेमेंट सिस्टम (स्विफ्ट) मध्ये निर्बंध घातल्यामुळे भारतीय रुपया आणि रशियन रूबलमध्ये करार करण्याची चर्चा आहे. तसेच पाश्चात्य देशांमध्ये शाखा नसलेल्या बँकांमधून रशियाला पेमेंट केले जाऊ शकते. या डीलमुळे पेट्रो बाजारात डॉलरची मक्तेदारी मोडीत निघणार आहे.
दुसरीकडे चीनची देखील सौदी अरेबियासोबत आपल्या चलनात, क्रुडची खरेदी करण्याबाबतची चर्चाही अंतिम टप्प्यात आहे. वास्तविक, इंधन दरवाढीमुळे जगभरात महागाईचा भडका उडाला आहे.