नेवासा – नेवासा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शुक्रवारी (दि.७) सायंकाळी अचानक हजेरी लावल्यामुळे कुकाणा व परिसरात डाळींब बागेसह लिंबोणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठी झाडेही उन्मळून पडली आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई देण्याची मागणी सरपंच संघटनेचे अध्यक्ष दिनकर गर्जे यांनी केली आहे. या नुकसानीबाबत गर्जे यांनी प्रातांधिकारी व नेवासा तहसिलदारांना अवकाळी पावसाची माहीती देवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
नेवासा तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावत विजेच्या गडगडाटासह वादळी वारा आल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे वडुले (ता.नेवासा) येथील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांच्या घरावर झाडे उन्मळून पडल्याची माहीती सरपंच संघटनेचे अध्यक्ष गर्जे यांनी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जून तहसिलदार संजय बिरादार,कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहीती देतात प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांना भेटी देण्यात आल्या असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई मिळावी अशी मागणी गर्जे यांनी केली आहे.