नेवासा – शासनाने अचानक कांदा खरेदी बंद केल्यामुळे नेवासा तालुका शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी (दि.१०) दुपारी चार वाजता देवगड फाटा येथील नाफेड कांदा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी अधिक आक्रमक होत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाचा जाहीर निषेध करण्यात केला.
देवगड फाटा येथे नाफेड कांदा खरेदी केंद्रावर ७० ते ८० वाहने शुक्रवार पासुन नंबरला उभे राहीलेले होते. मात्र रविवारपर्यंत हे वाहने कांदा खरेदी केंद्रावर खाली करुन घेतले गेले नाही आणि अचानक कांदा खरेदी बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करण्याची वेळ आली. यामुळे शेतकरी संघटना अधिक आक्रमक होवून राज्य शासनाच्या निर्णयाचा यावेळी जाहिर निषेध करण्यात आला.
कांदे खरेदी बंदचा निर्णय झाल्यामुळे शेतकरी मोठे हातबल झाले आहेत. नाफेडची ही शेतकऱ्यांवर मोठी मनमानी असल्याचे शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते जगन्नाथ पाटील कोरडे, नरेंद्र पाटील काळे व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
“भारतीय संविधानाने मतदान प्रक्रियेच्यावेळी नंबरला उभे असलेल्या मतदारांचे जर मतदान करुन घेतले जाते तर मग तीन – चार दिवस कांद्याचे वाहने नंबरला उभे असतांनाही ते खाली करुन न घेतल्यामुळे राज्य शासनाची हेकेखोर वृत्ती समोर येत असून यामुळे शेतकरी संघटनेतून तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.” नरेंद्र काळे, शेतकरी संघटना