नेवासा – राज्य सरकारने वकील संरक्षण कायद्याची तत्काळ अंमलबजाणी करुन न्यायदान प्रक्रियेत न्यायालयात महत्वाची भूमिका मांडणाऱ्या वकील बांधवांना कायद्याच्या चौकटीत संरक्षण मिळण्यासाठी वकील संरक्षण कायदा राज्य सरकारने तत्काळ संमत करावा, तसेच राहूरी येथील आढाव वकील दापंत्याचे अपहरण करुन निर्घृण खुन करणाऱ्या आरोपींच्या मास्टर माईंडचा शोध पोलीसांनी घेवून या हत्याकांडाचा उलगडा करावा, अशा मागणीसाठी नेवासा वकील संघाच्या वतीने नेवासा न्यायालयासमोर गुरुवार (दि.१) रोजी सकाळी १० वाजता साखळी उपोषण करण्यात आले.
वकील संघाच्या साखळी उपोषणाला राज्याचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी भेटी देवून पाठिंबा दिला. यावेळी आजी-माजी आमदार गडाख, मुरकुटे यांनी नेवासा वकील संघाच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी नेवासा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. कल्याण पिसाळ, उपाध्यक्ष अॅड. वैभव वाकचौरे, महिला वकील उपाध्यक्ष उत्कर्ष मोटे, सचिव राजेंद्र नेव्हल, सहसचिव महेश लवांडे, खजिनदार देवदान जावळे, विश्वस्त अॅड. संतोष शेटे, अॅड.भारतभुषण मौर्य, अॅड.अजित वाबळे, अॅड. अलका जंगले, अॅड.महेश बोरुडे या वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांसमोर आमदार शंकरराव गडाख व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी उपोषणस्थळी भेट देवून सविस्तर चर्चा केली.
यावेळी बोलतांना नेवासा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. कल्याण पिसाळ म्हणाले की, मानोरी (ता.राहूरी) येथील अॅड. राजाराम आढाव व त्यांची पत्नी अॅड. मनिषा आढाव या वकील दाम्पत्याचा समाजकंटकांनी खंडणीसाठी अमानुष्यपणे निर्घुण खुन केल्याची घटना गुरुवार (दि.२५) रोजी घडलेली आहे. या घटनेचा नेवासा वकील बांधवांकडून तिव्र निषेध करण्यात येत असून या वकील दांपत्याच्या खुनातील मास्टर माईंडचा शोध पोलीसांनी घेण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.
यावेळी अॅड.आर.आर.येळवंडे, वसंतराव नवले, बन्सी सातपते, अॅड.बाळासाहेब कावळे, अॅड.बन्सी सातपुते, अॅड.जानकिराम डौले, अॅड.कैलास कापसे, अॅड.प्रदिप वाखुरे, अॅड.संदिप कोतकर, अॅड. डी.आर. काळे, अॅड.एन.एस.जोशी, अॅड.नितीन अडसुरे, अॅड. अण्णासाहेब अंबाडे, अॅड.गोकुळ भताने, अॅड. ए.टी. झिने, अॅड.कैलास राऊत, अॅड.अण्णासाहेब जाधव, अॅड.प्रसाद गर्जे, अॅड.बाळासाहेब कचरे, अॅड.सोमनाथ वाघचौरे, चंद्रकांत कदम, सुदाम ठुबे, अर्जून शेंडे, यांच्यासह वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहूरी येथील वकील दांपत्याचे अपहरण करुन खुन झाल्यानंतर या प्रकरणी मारेकऱ्यांच्या शोध घेवून या गुन्ह्यातील मास्टरमाईंड गुन्हेगाराला पकडण्यासाठी नेवासा वकील संघाने प्रथम न्यायालयात काम बंद आंदोलन केले. नेवासा तहसिलदार पोलीस निरिक्षकांना निवेदन दिले व आता एक दिवशीय साखळी उपोषण सुरु केल्यामुळे जिल्ह्यात नेवासा वकील संघ आढाव दांपत्याच्या खुनप्रकरणी अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. यावेळी नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या वतीने वकील बांधवांच्या आंदोलनाला एकता पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनी पाठिंबा दिला.