नेपाळी दाम्पत्याची आत्महत्या ; गळफास घेऊन संपवले जीवन

विवाहाला अवघे वर्ष झाले होते

पुणे – नेपाळी दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी रास्ता पेठेत घडली. पतीने गळफास घेतल्यानंतर पत्नीनेही गळफास घेऊन जीवन संपवले. संबंधित व्यक्ती एका सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. घटनास्थळी समर्थ पोलिसांची पथक दाखल झाले आहे. पुणे शहरात मागील तीन दीवसांतील ही सहावी आत्महत्याचे घटना आहे. सुखसागरनगर येथे एका दांम्पत्याने आपल्या दोन चिमुकल्यांना फासावर लटकवत स्वत:त आत्महत्या केली होती. तर त्याच दिवशी धायरी येथे एका मंडप व्यवसायीकाने आत्महत्या केली. दरम्यान शनिवारी सहकारनगर येथे एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. पिंपरी-चिंचवड आणी पुणे शहरात मागील चार पाच दिवसांत आत्महत्येच्या घटनांची वाढ झाली आहे.

सुरज सोनी (27,रा.पदमजी पार्क, विश्राम सोसायटी, रास्ता पेठ), अरुणा सुरज सोनी ( 22) असे आत्महत्या केलेल्या दांम्पत्याचे नाव आहे.
यासंदर्भात माहिती देताना समर्थ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पलांडे यांनी सांगितले, सुरज सोनी हा अवघ्या चार महिण्यापुर्वीच संबंधीत सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला लागला होता. तो सोसायटीच्या आवारातच एका खोलीत पत्नी अरुणा आणि मेव्हण्यासोबत रहात होता. सकाळी नऊच्या सुमारास सोसायटीच्या सदस्यांनी पोलिसांना याची खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर त्यांना दोघेही एक खोलीत पत्र्याच्या हुकला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांचे मृतदेह खाली काढून ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

* पतीचा मृत्यू पाहून तीनेही घेतला फास *
सुरज आणि अरुणा यांच्या विवाहाला एक वर्षे झाले होते. विवाहानंतर त्यांचे सतत वाद होत होते. शनिवारी रात्री सुरज आतल्या खोलीत एकटा झोपला होता. तर पत्नी अरुणा आणि तीचा भाऊ खोली बाहेर झोपले होते. तीच्या भावाने सकाळी उठून खोलीचा दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. यामुळे त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता सुरज फासावर लटकलेला दिसला. त्यांने तातडीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यानंतर त्याने सुरजच्या भावाला माहिती देण्यासाठी पुलगेट येथे धाव घेतली. तो सूरजच्या भावाला घेऊन खोलीत आला तर तेव्हा अरुणानेही गळफास घेतलेला आढळला. दोघांनीही ओढणीने पत्र्याच्या अँगलला गळफास घेतला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.