काठमांडू – दुर्गा पुजेनिमित्त घरी परतत असलेल्या प्रवाशांची बस नदीत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 28 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाल्याची माहिती आहे. बसमध्ये एकूण 42 प्रवासी होते. ही घटना नेपाळमधील मुगु जिल्ह्यात घडली.
नेपाळगंजहून मुगु जिल्ह्याताली गमगाधीला ही बस जात होती. यावेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने पिना झयारी नदीमध्ये बस कोसळली. घटनेची माहिती मिळताच खुरखेतहून नेमाळी सैन्याचे हेलिकाॅप्टर मदतीसाठी पोहोचले आहे.
14 जखमींना हेलिकाॅप्टरने नेपाळगंजला हलविण्यात आले आहे. मृतांमध्ये विद्यार्थी व मजूर लोक असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्वजन सणासाठी भारतातून परतले असल्याचे समजते. स्थानिक जिल्हाधिकारी महत यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसचा टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रन सुटले आणि मोठ्या उंचीवरून ही बस दरीत घसरत नदीमध्ये पडली.