“ना जवान, ना किसान मोदी सरकार के लिए उद्योगपती मित्र ही भगवान”

राहुल गांधींचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

नवी दिल्ली: केंद्र सरकारने सादर केलेलय अर्थ संकल्पावरून विरोधी पक्षाने मोदी सरकारवर टीका करण्यास सुरवात केली आहे. त्यात आता पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारच्या अर्थसंकल्पावर बोलत मोदींवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारचा हा शेतकरी आणि जवानांच्या फायद्याचा नसून केवळ उद्योगपतींच्या फायद्याचा असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

सरकारचा अर्थसंकल्प हा सामान्य भारतीयांचा नसून केवळ एक टक्के लोकसंख्येसाठीचा अर्थसंकल्प असल्याची टीकाही त्यांनी केली. राहुल गांधी यांनी सैनिकांच्या पेन्शन कपातीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. काही उद्योगपतींचे हित डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेन्शनमध्ये कपात करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी एक ट्वीट केलं असून त्यात ते म्हणाले की, “अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेन्शनमध्ये कपात करण्यात आली आहे. जवान आणि शेतकरी नाहीत तर मोदी सरकारसाठी केवळ तीन-चार उद्योगपती देव आहेत.” राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरुन केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली आहे. या आधी त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरुन सरकारवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, “मोदी सरकारने देश आणि घर या दोन्हींचे बजेट बिघडवले आहे.”

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.