मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘स्वरा भास्कर’ आपल्या रोखठोक बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री सतत सोशल मीडियावर बेधडक वक्तव्य करत कधी कौतुक तर कधी टीकेला सामोरं जाते. अश्यातच अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आणि याच कारण देखील खास आहे.
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री स्वरा भास्कर हिने आपल्या बॉयफ्रेंड आणि राजकीय नेता असणाऱ्या फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज आणि साखरपुडा केला आहे. स्वतः स्वराने तिच्या कोर्ट मॅरेजचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. या दोघांचे धर्म वेगवेगळे आहेत. फहाद मुस्लीम तर स्वरा हिंदू आहे. मात्र, या दोघांची पहिली भेट शाहिनबागच्या आंदोलनात झाली होती.
दरम्यान, आता अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी दिल्लीत लग्न केलं. मात्र हे लग्न पारंपरिक पद्धतीने पार पडलं नाही. या दोघांनी सप्तपदी घेतली नाही किंवा निकाहसुद्धा केला नाही. स्वरा आणि फहादने फक्त मेहंदी, हळद आणि संगीत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
यावेळी स्वराने लाल साडी आणि त्यावर साजेसे दागिने असा तिचा लूक पूर्ण केला होता. तर फहादने जीन्स, पांढरा शर्ट आणि त्यावर गोल्डन कलरचा नेहरू जॅकेट परिधान केला होता. सध्या या दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. तर, येत्या 15 मार्च रोजी कव्वाली समारोहसुद्धा आयोजित करण्यात आला आहे.