तेल अबीव
जगाच्या पाठीवर असलेल्या विविध देशांमध्ये इस्त्राईलची युद्धविषयक तयारी नेहमी चर्चेचा विषय असते सर्व प्रकारच्या आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून इस्त्राईल नेहमीच शस्त्रसज्ज होते या देशाच्या संरक्षण खात्याने विकसित केलेल्या विशेष अशा ड्रोनची सध्या चर्चा आहे इस्त्रायल विरोधात कारवाई करणाऱ्या हमास आणि हिजबुल्ला या दहशतवादी संघटनांच्या मनातही या ड्रोन कारवाईची मोठी दहशत आहे ब्लॅक स्नेक नावाच्या या अत्याधुनिक ड्रोन साठी एका विशेष स्कॉड्रनची स्थापना करण्यात आली असून देशविरोधात कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांच्या विरोधात या ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे इस्रायलच्या संरक्षण खात्यामध्ये जेवढे ड्रोन सज्ज आहेत त्यापैकी 80% ड्रोन हे ब्लॅक स्नेक या प्रकारातील आहेत.
हे ड्रोन फक्त टेहळणी करण्याचेच काम करतात असे नाही तर गरज पडल्यात शत्रूवर हल्ला करण्याचे कामही पूर्ण करू शकतात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शत्रू राष्ट्रच्या किंवा दहशतवादी संघटनेच्या रडारवर हे ड्रोन कधीही येत नाहीत म्हणजेच या ड्रोनच्या कारवाया शत्रूच्या नजरेस कधीच पडत नाहीत हेच या ड्रोनचे वैशिष्ट्य मानले जाते इस्रायल सरकारच्या नजरेतून नेहमीच डोकेदुखीचा विषय असलेला वेस्ट बँक गाजापट्टी आणि लेबानन सीमा या प्रदेशांमध्ये हे ड्रोन नेहमीच तैनात केले जातात संरक्षण खात्यातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या काही वर्षांमध्ये इस्त्राईलने संरक्षण सज्जतेसाठी विमाने किंवा हेलिकॉप्टर्स यापेक्षाही ड्रोनवर जास्त विश्वास ठेवला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आणि अधिक संख्येने आता ड्रोनच विकसित करण्यात येत आहेत
युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास विमाने आणि हेलिकॉप्टरपेक्षा ड्रोन लगेच तैनात करणे शक्य असल्याने इस्त्रायलच्या संरक्षण खात्याने ड्रोनवर जास्त विश्वास ठेवला आहे ब्लॅक स्नेक नावाचे हे अत्याधुनिक ड्रोन तब्बल वीस तास उड्डाण करू शकते विमान किंवा हेलिकॉप्टर ज्या काही कारवाया करू शकतात त्या सर्व प्रकारच्या कारवाया ड्रोनच्या माध्यमातून करणे शक्य होत आहे