बॉलिवूडमधील गायिका नेहा कक्कड नेहमीच चर्चेत असते. आता नेहा कक्कडने जगभरातील अनेक गायकांना धोबी पिछाड दिला आहे. नेहाने आता एक आंतरराष्ट्रीय कलाकार म्हणून उभारी घेतली असून जगभरातील लोकांना तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
होय, हे खर आहे. नेहा कक्कड़ ही यू-ट्यूबवर जगभरात सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या महिला कलाकारांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिकन रॅपर कार्डी बी आहे. या यादीमध्ये नेहाशिवाय अन्य कोणत्याही भारतीय महिला कलाकाराचा समावेश नाही. नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार कार्डी बी हिला यु-ट्यूबवर 4.8 बिलियन प्रेक्षकांनी सर्च केले आहे. त्याच वेळी नेहा कक्कडला 4.5 बिलियन प्रेक्षकांनी सर्च केले आहे. विशेष म्हणजे नेहाने एकापेक्षा एक अशा मोठया कलाकारांना मागे टाकले आहे.
यामध्ये कोलंबियाची गायिका करोल जी, दक्षिण कोरियन गर्ल गुपची ब्लॅक पिंक, अमेरिकन गायिका ऍरिना ग्रान्डे, ब्राझीलची गायिका मॅरीलिया मॅंडोंका अशी मोठी नावे आहेत. या यादीत दुसरे स्थान मिळविल्याने नेहा देखील खूप आनंदी आहे. इंस्टाच्या माध्यमातून ही माहिती देताना नेहाने तिच्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, नेहा ही “इंडियन आयडल-6’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यानंतर आज ती या शोची जज बनली आहे. देशातील गायिकांमध्ये सध्या ती आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.